Institute of Banking Personnel Selection (IBPS) 1 नोव्हेंबर 2022 पासून ibps.in या अधिकृत वेबसाइटवर विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्ती 21 नोव्हेंबर 2022 पूर्वी अर्ज करू शकतात. एकूण 710 पदांची भरती होणार आहे यात कायदा अधिकारी, IT अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, HR/वैयक्तिक अधिकारी आणि विपणन अधिकारी या 710 पदांसाठी भरती केली जाईल.
प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, उमेदवारांनी यासाठी अधिकृत अधिसूचना पाहावी. या भरती परीक्षेत पुढील बँका सहभागी असून निवड झालेल्या उमेदवारांना या बँकेत नियुक्ती मिळेल बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक. यासाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. तर SC/ST/PWBD उमेदवार यांना रु. 175 व इतर श्रेणी उमेदवारांना रु 850 परीक्षा शुल्क आकारले जाईल
अर्ज कसा करायचा
1 सर्वप्रथम तुम्हाला ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2 “click here to apply online for common recruitment process CRP SPL-XII” या लिंकवर क्लिक करा
3 स्वतःची नोंदणी करा आणि “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करा.
4 तुमचा फोटो अपलोड करा, डाव्या अंगठ्याचा ठसा, सही करा.
5 अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
टिप्पणी पोस्ट करा