आरएसएस (RSS) आणि सावरकरांवर खोटे आरोप करणे ही काँग्रेसची फॅशन : इंद्रेश कुमार

 


काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सावरकरांवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सावरकरांवर इंग्रजांना मदत केल्याचा आरोपही केला. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणातील अपयशाबद्दल त्यांची निराशा असल्याचे  प्रत्युत्तर आरएसएसचे  इंद्रेश कुमार (RSS Leader Indresh Kumar) यांनी दिले आहे.

राहुल गांधींनी सावरकर आणि संघाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार  यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी सांगितले "राहुल गांधींचे सावरकर आणि आरएसएसबाबतचे वक्तव्य खोटे आहे. आरएसएस आणि सावरकरांवर खोटे आरोप करणे ही काँग्रेसची फॅशन झाली आहे." आरएसएस नेत्याने सांगितले की, "सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा दिली होती. राहुल गांधींनी खोटे बोलणे बंद करावे."

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे (Congress Bharat Jodo Yatra) नेतृत्व करत असलेले राहुल गांधी यांनी कर्नाटकातील (Rahul Gandhi in Karnataka) एका सभेत सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यात सावरकर ब्रिटिशांसाठी काम करायचे आणि त्यासाठी त्यांना पैसा मिळत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटिश राजवटीला पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेस खासदाराने पुढे केला. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात लढण्यात विश्वास ठेवते. काँग्रेस नेते म्हणाले, मी नेहमीच एका विशिष्ट विचारावर उभा राहिलो, ज्यामुळे भाजप आणि आरएसएसला त्रास होतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने