ब्रिटनच्या गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन ( Suella Braverman) यांची हाकालपट्टी

 


ब्रिटनच्या गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन ( Suella Braverman) यांनी लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या भेटीनंतर गृह सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. सुएला ब्रेव्हरमन यांना आज दुपारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान लिझ ट्रस राजीनामा देण्यास सांगितले अशी माहिती मिळते, द गार्डियनने या संबंधी वृत्त दिले आहे (Suella Braverman has reportedly resigned from her role as Home Secretary). 

सुएला ब्रेव्हरमन यांनी आज पंतप्रधानांच्या भेटी नंतर संरक्षण तंत्रज्ञान कंपनीची भेट रद्द केली होती. गार्डियनने या वृत्तपत्राच्या वृतानुसार माजी परिवहन सचिव ग्रँट शॅप्स (Grant Shapps) हे कदाचित ब्रेव्हरमनची यांची जागा घेतील. ITV राजकीय संपादक रॉबर्ट पेस्टन (Robert Peston) यांच्या एका ट्विट नुसार सुएला ब्रेव्हरमन यांना सुरक्षा संबंधित एका मुद्द्यावर राजीनामा देण्यास सांगितले होते असे समजते. 

सुएला ब्रेव्हरमन यांची सरकारमधून झालेली हाकालपट्टी ही पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातून दुसरी मोठी हाकालपट्टी असुन याआधी कुलपती क्वासी क्वार्टेंग (Kwasi Kwarteng) यांची हाकालपट्टी झाल्यानंतर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत  ब्रेव्हरमन यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. ब्रेव्हरमन यांनी भारतासंबंधी केलेल्या एका व्यक्तव्या संदर्भात भारताने देखील ब्रिटन कडे तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. त्यांची हाकालपट्टी करण्यात हा मुद्दा पण महत्वपूर्ण ठरला असे समजते.   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने