महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV साठी Jio BP चार्जिंग नेटवर्क उभारणार

 


देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंट्स आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या उभारणीला वेग आला आहे. आता महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV साठी Jio BP चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. याशिवाय गेल्या महिन्यातच Jio BP ने इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता Hero सोबत EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्याच्या योजनेवर काम सुरु केले आहे.

भारतात एसयूव्ही श्रेणीतील वाहने बनवणारी महिंद्रा अँड महिंद्राची इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार आहे. Mahindra & Mahindra (M&M) आणि Jio BP यांनी महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी हातमिळवणी केली आहे. गेल्या वर्षीच या कंपन्यांनी EV उत्पादने आणि सेवांच्या निर्मितीच्या क्षेत्रातही करार केला होता.

जिओ बीपी महिंद्रा डीलरशिप नेटवर्क आणि डीसी फास्ट चार्जर स्थापित करेल. सुरुवातीला ही फास्ट चार्जिंग स्टेशन्स देशातील 16 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. नंतर ही चार्जिंग स्टेशन्स लोकांसाठी खुली केली जातील. Jio BP देशात इलेक्ट्रिक चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहे. Jio BP ने चारचाकी कार चार्जिंगसाठी महिंद्रासोबत हातमिळवणी केली आहे, तर काही महिन्यांपूर्वी Jio BP ने इलेक्ट्रिक टू व्हीलर चार्जिंगसाठी Hero Electric सोबत करार केला आहे.

महिंद्राने या महिन्याच्या सुरुवातीला आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक सेगमेंट XUV 400 लाँच केली आहे. कंपनी येत्या काही वर्षात देशात इलेक्ट्रिक वाहनांची संपूर्ण श्रेणी लॉन्च करणार आहे. यासाठी जलद चार्जिंग पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल आणि कंपनीने आपल्या ग्राहकांना जलद चार्जिंग नेटवर्क प्रदान करण्यासाठी Jio BP सोबत भागीदारी केली आहे.

RIL आणि BP यांचा संयुक्त उपक्रम शहरे आणि प्रमुख महामार्गांवर चार्जिंग सुविधा उभारून आपल्या Jio-BP पल्स ब्रँडेड EV चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करत आहे यामुळे EV मालकांसाठी चांगली चार्जिंग सुविधा उपलब्ध होईल. Jio BP आणि Mahindra संयुक्तपणे भारतात इलेक्ट्रिक पॅसेंजर कार घेण्यास चालकांना प्रोत्साहन देनार असून यामुळे देशाचे शून्य उत्सर्जन लक्ष्य जलद साध्य करण्यात मदत होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने