T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव, मालिका भारताच्या खिशात.

 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना आज गुवाहाटी येथे खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आज भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत  भारताने मालिकेत 2-० अशी आघाडी घेतली व 3 सामन्याची मालिका आपल्या खिशात घातली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने 90 हून अधिक धावांची भागीदारी केली. राहुल आणि सूर्यकुमार यांनी अर्धशतकं ठोकली. सूर्यकुमारने 18 चेंडूत अर्धशतक ठोकले. विराट कोहली 49 धावांवर नाबाद राहिला.

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने धावांचा पाठलाग करताना सुरवातीला लवकरच दोन गडी गमावले परंतु नंतर डेव्हिड मिलरचे शतक केले  . मिलरने 47 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी खेळली पण हि खेळी वाया गेली. भारताच्या 237 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला आणि आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव झाला  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने