T20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडने सामना जिंकला.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने इंग्लंडसमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पाऊसाची सुरवात होई पर्यंत 14.3 षटकांत 5 विकेट गमावून केवळ 5 धावा करू शकला. या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज फ्लॉप ठरले. आयर्लंडच्या जोशुआ लिटलने सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बटलरने शून्य आणि अॅलेक्स हेल्सने 7 धावा केल्या.
यानंतर फियोन हँडने बेन स्टोक्सला अवघ्या 6 धावांवर आउट केले. 21 चेंडूत 18 धावा करून हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. मॅकार्थीच्या चेंडूवर फिओन हँडने त्याचा झेल घेतला. मोईन अली 12 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोन एका धावेवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, आयर्लंडने फलंदाजी करताना वेगवान सुरुवात केली पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांना पहिला धक्का बसला. संघाचा स्टार फलंदाज पॉल स्टर्लिंग 14 धावा करून मार्क वुडच्या चेंडूवर सॅम कुरनकरवी झेलबाद झाला. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज लॉकरेन टकर हा कर्णधार अँडी बालबर्नीला साथ देण्यासाठी क्रीझवर आला. दोघांनी आयर्लंडची धुरा सांभाळली आणि दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एरिनला आणखी एक धक्का बसला आणि लॉर्कन टकर 27 चेंडूत 34 धावा काढून धावबाद झाला.
त्याच्या पाठोपाठ हॅरी टॅक्टर क्रीजवर होता. पण तो फार काही करू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला. यानंतर कर्टिस केम्पफरसह बालबर्नी फलंदाजीला आला. बालीबर्नीने 40 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने टी-20 कारकिर्दीतील 8 वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर तो जास्त काळ राहू शकला नाही आणि लिव्हिंगस्टोनने त्याला बाद केले. बलबर्नीने 47 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.
यानंतर इंग्लंडचा संघ अडखळला आणि एकापाठोपाठ एक विकेट पडत राहिली. जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेन्ली आणि इतर सर्व खेळाडू एक एक करून पॅव्हेलियनमध्ये परतले आणि आयर्लंडचा डाव 19.2 षटकांत 157 धावांत गुंडाळला गेला. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन, सॅम कुरनने दोन गडी बाद केले. तर बॅन स्टोक्सने एक विकेट घेतली. याआधी 2015 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि या T20 स्पर्धेतही वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केले आणि आजही या T20 स्पर्धेत इंग्लंडला पराभूत केले.
टिप्पणी पोस्ट करा