T20 World Cup 2022 : धक्कादायक नामीबियाने श्रीलंकेवर 55 धावांनी विजय मिळवला

 


टी 20 विश्वचषकाला  (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलिया येथे आजपासून सुरवात झाली.आज झालेल्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नांबिया संघाने श्रीलंका संघावर विजय मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केल. आज GMHBA मैदानात  श्रीलंका आणि नामीबियामध्ये (Srilanka vs Namibia) पहिली मॅच झाली. नामीबियाच्या तुलनेत श्रीलंकेचा संघ (SrilankaTeam) मजबूत हा मानला जातो. सामना सुरु होण्याआधी सर्वांना श्रीलंका सहज विजय मिळवेल, असं वाटलं होतं. दुबळ्या नामीबियाच श्रीलंकेसमोर काही चालणार नाही, असाच सर्वांनी अंदाज बांधला होता. परंतु हा अंदाज नांबिया संघाने फोल ठरवला आणि  श्रीलंकेवर सहज विजय मिळवला. 

नामीबियाने श्रीलंके समोर 164 धावांचे लक्ष ठेवले होते त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. कुशल मेंडीस (6) आणि पाथुम निसांका (9) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. 40 धावात श्रीलंकेचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर भानुका राजपक्षे (20) आणि कॅप्टन दासुन शनाका (29) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 74 धावा फलकावर लागल्या असताना राजपक्षे आऊट झाला. त्यानंतर श्रीलंकेला आपला डाव सावरता आला नाही.

नामीबिया संघाकडून  डेविड, बर्नाड, बेन आणि जॅन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना नामीबियाची सुरुवातही फार चांगली झाली नव्हती. 35 धावात त्यांच्या तीन विकेट गेल्या होत्या. नामीबियाने जॅन निकोल (20), स्टीफ्न बार्ड (26), जॅन फ्रायलिंक (44), जेजे स्मिथ नाबाद (31) यांच्या दमदार खेळीच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारली. प्रतिउत्तरा दाखल श्रीलंकेचा संघ 19 ओव्हर मध्ये 109 धावात तंबूत परतला. आणि पहिल्याच सामन्यात  नामीबियाने श्रीलंकेवर 55  धावांनी विजय मिळवला.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने