T20 World Cup 2022: वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड (WI vs SCO) यांच्यात आज रंगणार सामना

 


टी 20 विश्वचषकाला सुरुवात झाली असुन, काल रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. तर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात नेदरलँड्सने UAE चा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. आज म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी गट ब मध्ये वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड (WI vs SCO) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. वेस्ट इंडिजची कमान निकोलस पूरन यांच्या हाती असेल. तर रिची बेरिंग्टन स्कॉटलंड संघाचे नेतृत्व करेल. 

दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली असता एकीकडे दोन वेळचा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिजकडे अतिशय अनुभवी आणि आक्रमक खेळाडू आहे. दुसरीकडे, स्कॉटलंडच्या संघाकडे अनुभवाची कमतरता दिसून येते जरी असले तरी, वेस्ट इंडिजला स्कॉटलंडच्या संघाला हलक्यात घेता येणार नाही. दोन्ही संघांमध्ये अनेक आक्रमक खेळाडू आहेत, यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा दिसू शकते.

इतिहासात डोकावले असता होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. येथे गोलंदाजांनाही खूप वेग मिळतो.  त्याचबरोबर या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते. येथे खेळल्या गेलेल्या तीन टी-20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. 

वेस्ट इंडिज संभाव्य प्लेइंग इलेव्हन

निकोलस पूरन (कर्णधार), रोमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय.

स्कॉटलंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (उप-कर्णधार), जॉर्ज मुन्से, ब्रॅडली व्हील्स, ख्रिस सोल, ख्रिस ग्रीव्हज, जोश डेव्ही, कॅलम मॅकलिओड, ब्रेंडन मॅककुलन, मायकेल जोन्स, क्रेग वॉलेस.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने