T20 World Cup 2022 : विराट दिवाळी, भारताची पाकिस्तानवर मात

 


आज मेलबर्न येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) 4 गडी राखून मात केली आणि गेल्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला.  आज भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताच्या समोर जिंकण्यासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताचा विजयाचा शिल्पकार ठरलेल्या  विराट कोहलीच्या 53 चेंडूत 82 धावा यामुळे शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून मात केली. 

भारतीय डावाची सुरवात निराशाजनक झाली दुसऱ्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला. केएल राहुल 4 धावा करून बाद झाला,  त्यानंतर चौथ्या षटकात 10 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 7 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. परंतु त्याला 15 धावांवर हरिस रौफने बाद केले. यानंतर आलेला अक्षर पटेल धावबाद झाला. त्याने 2 धावा केल्या. भारताची अशी बिकट अवस्था असताना विराट एका बाजूला एकटा किल्ला लढवत होता त्याला साथ दिली हार्दिक पांड्याने दोघांमध्ये 78 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली परंतु हार्दिक पांड्या शेवटच्या षटकात 40 धावांवर बाद झाला. यानंतर विराटने एकहाती सामना जिंकून दिला. 

या आधी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या पदार्पणाच्या T20 विश्वचषक सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाबर आझमला शून्यावर बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. अर्शदीप सिंगने भारताला दुसरे यश मो. रिझवान च्या रूपाने मिळवले तो 4 धावांवर झेलबाद झाला. यानंतर  इफ्तिखार अहमद भारतासाठी धोकादायक ठरत होता आणि त्याने 34 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, पण शमीने त्याला  आऊट करून त्याचा डाव संपवला आणि भारताला दिलासा दिला.

हार्दिक पांड्याने भारताला चौथे यश मिळवून दिले आणि 5 धावांवर शबद खानला सूर्यकुमार यादव करवी झेलबाद केले. हार्दिक पांड्याने हैदर अलीच्या रूपात दुसरी विकेट घेतली आणि त्याला 2 धावांवर सूर्यकुमारकरवी झेलबाद केले. हार्दिकने  या सामन्यातील तिसरी विकेट नवाजच्या रूपाने घेतली आणि त्याला 9 धावांवर झेलबाद केले. अर्शदीप सिंगने आसिफ अलीला 2 धावांवर झेलबाद केले. शाहीन आफ्रिदी 16 धावांवर भुवी कुमारच्या चेंडूवर झेलबाद झाला. शान मसूदने 42 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. भारताकडून पहिल्या डावात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने 3-3 तर भुवी आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.    


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने