T20 World Cup 2022 : विश्वचषक मधील आजचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द

 


T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये शुक्रवारी (28 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन सामने खेळवले जाणार होते. पहिल्या सामन्यात आयर्लंड आणि अफगाणिस्तान आमनेसामने येणार होते. तर दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार होता. पण पावसामुळे ग्रुप-2 चे हे दोन्ही सामने रद्द करावे लागले. सतत पावसाचा जोर असल्यामुळे, दोन्ही सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.

सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासमोर आता अडचणी निर्माण झाल्या असून दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीचा प्रवास कठीण झाला आहे. सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गुण विभागले गेले आहेत. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोघांचे ३-३ असे समान गुण झाले  आहेत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला आता उर्वरित सामना जिंकण्याव्यतिरिक्त इतर संघांच्या विजय किंवा नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या गट सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने श्रीलंकेचा पराभव केला. तर इंग्लंडने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमामुळे आयर्लंडकडून त्यांचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाला आता आयर्लंड आणि अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. दुसरीकडे, इंग्लंडची स्पर्धा श्रीलंका आणि न्यूझीलंडशी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने