T20 World Cup : इंग्लंडचा अफगाणिस्तानवर सहज विजय

 


T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 चा  Super 12 चा दुसरा सामना इंग्लंड व अफगाणिस्तान यांच्यात पर्थच्या मैदानावर झाला. या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर  प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 112 धावांवर बाद झाला 

अफगाणिस्तानचा डाव गुंडाळण्यात सॅम कुरनचा मोठा वाटा होता, त्याने 5 बळी घेतले. इंग्लंडला विजयासाठी 113 धावांचे लक्ष्य मिळाले आणि या संघाने 18.1 षटकात 5 विकेट गमावत 113 धावा करून सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह इंग्लंड संघाचे दोन गुण झाले. सॅम करनला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर अॅलेक्स हेल्ससोबत डावाची सुरवात केली, पण तो 18 चेंडूत 18 धावा करून झेलबाद झाला. बटलरनंतर अॅलेक्स हेल्स 19 धावा करून बाद झाला. इंग्लंडची तिसरी विकेट बेन स्टोक्सच्या रूपाने पडली, त्याला कर्णधार मो.नबीने 2 धावांवर बोल्ड केले. डेव्हिड मलान 18 धावा करून मुजीबच्या चेंडूवर झेलबाद झाला, तर हॅरी ब्रुकला रशीद खानने 7 धावांवर झेलबाद केले. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद 29 धावा तर मोईन अलीने नाबाद 7 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

या आधी फलंदाजी करताना संघाची धावसंख्या 11 धावांवर असताना अफगाणिस्तानची पहिली विकेट पडली. या संघाचा सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज 10 धावांवर मार्क वुडच्या हाती झेलबाद झाला. या संघाची दुसरी विकेट हजतुल्लाह जझाईच्या रूपात पडली, तो 7 धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या संघाची तिसरी विकेट 32 चेंडूत 32 धावा करणारा इब्राहिम झद्रान रूपाने पडली तो सॅम कुरनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचवेळी नजीबुल्ला जद्रानने 13 धावांची खेळी खेळली आणि तो बेन स्टोक्सचा बळी ठरला.

संघाचा पाचवी विकेट कर्णधार मोहम्मद. नबी च्या रूपाने पडली, त्याला मार्क वूडने 3 धावावर बाद केले. यानंतर अजमतुल्ला ओमरझाई 8 धावा करून सॅम कुरनचा बळी ठरला, तर राशिद खानही सॅम कुरनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. मुजीब-उर-रहमानला ख्रिस वोक्सने शून्यावर बाद केले. उस्मान घनीला सॅम कुरनने 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंडसाठी सॅम कुरन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने एकूण 5 बळी घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने