T20 World Cup: दक्षिण आफ्रिके विरुद्धचा कालचा सामना का हरला भारत ?

 


टी-20 विश्वचषकात सलग 2 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना गमवावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेला 134 धावांचे लक्ष्य दिले होते. यात सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत 68 धावा करून भारताला एक चांगल्या धावसंख्ये पर्यंत नेले होते, पण बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. तसेच क्षेत्ररक्षणात देखील भारताने विकेट मिळवण्याच्या तीन संधी गमावल्या आणि कालच्या सामन्यात अश्विन पुन्हा महागडा ठरला. या विश्वचषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात टीम इंडिया हा सामना का हरला याचा घेतलेला हा मागोवा. 

भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण खराब फलंदाजी हे होते. मधली फळी फ्लॉप ठरली. लोकेश राहुल, विराट कोहली, दीपक हुडा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांची फलंदाजी शांत राहिली. टीम इंडियाने कालच्या सामन्यात एकावेळी 49 धावांवर 5 मोठ्या विकेट गमावल्या होत्या. सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने पाकिस्तानविरुद्ध त्याने 82 धावांची धडाकेबाज खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच नेदरलँडविरुद्धही विराट कोहलीने चांगली खेळी खेळली होती त्याने 44 चेंडूत 62 धावा केल्या होत्या परंतु या सामन्यात तो अपयशी ठरला त्याने 11 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावा करून तो बाद झाला.

गोलंदाजीच्या बाबतीत तर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्या पासून कालच्या सामान्यपर्यंत आर अश्विन अपयशी ठरला आहे परंतु काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अश्विनकडून संघाला मोठ्या आशा होत्या. याचे कारण दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरे फलंदाज बरेच होते. परंतु अश्विनची जादू  येथेही चालली नाही. त्याने सामन्यात 4 षटकात 43 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. आता पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला, तो सुमार दर्जाचाच होता. सुरवातीला अर्शदीपने चांगली सुरुवात करून डी कॉकला बाद केले. परंतु नंतरच्या क्षेत्ररक्षणामुळे संपूर्ण खेळ बिघडत गेला.  क्षेत्ररक्षणा दरम्यान सूर्यकुमार यादवने एक आणि रोहित शर्माने दोन फलंदाजांना धावबाद करण्याच्या संधी गमावल्या. 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहित मार्करामला धावबाद करू शकला नाही.  12व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 35 धावांवर असलेल्या मार्करामचा सोपा झेल विराट कोहलीने सोडला. मार्करामने याचा पुरेपूर फायदा उठवत 41 चेंडूत 52 धावा केल्या. व संघाला विजयाच्या मार्गावर नेले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने