भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिल्या T20 सामन्यात नेत्रदीपक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे जात आहे आणि आता दुसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, हवामानाचा अहवाल काय सांगतो हे जाणून घेऊया.
भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 सामन्यादरम्यान गुवाहाटीचे तापमान 28 अंश असण्याची शक्यता आहे. मात्र येथे होणाऱ्या दुसऱ्या T20 मध्ये पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुवाहाटीमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरला होणारा सामना पावसामुळे खंडित किंवा विलंबाने होऊ शकतो.
गुवाहाटी येथिल बारसपारा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आतापर्यंत येथे फक्त दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. गुवाहाटीमध्ये नाणेफेक जिंकनारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, कारण पावसाचा परिणाम सामन्यावर दिसून येईल. येथे पहिल्या डावात 160-170 धावांची सरासरी आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी 180 धावा कराव्या लागतील.
भारत संभाव्य संघ पुढील प्रमाणे राहील: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ पुढील प्रमाणे राहील: टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरीझ शम्सी, एनरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
टिप्पणी पोस्ट करा