युक्रेनवरील भूभागावर रशियाच्या ताब्याविरोधात UNGA मध्ये ठराव मंजूर


 

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) युक्रेनच्या लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन या चार प्रदेशांवर रशियाच्या ताब्याविरोधात ठराव मंजूर केला आहे. संयुक्त राष्ट्रात एकूण 143 सदस्यांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर पाच सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्याच वेळी, भारतासह इतर 35 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. यावेळी भारतातर्फे भारताच्या स्थायी प्रतिनिधी,रुचिरा कंबोज, म्हणाल्या 'हे युद्धाचे युग असू शकत नाही, असे भारताच्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताने या ठरावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे" त्या युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA)मध्ये बोलत होत्या

रशियाच्या विरोधात बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावात कोणत्याही सदस्य देशाने व्हेटोचा वापर केला नाही. UNGA मध्ये हा प्रस्ताव युक्रेन आणि रशिया यांच्यात परत जोरदार संघर्ष झाल्यानंतर दोन दिवसांनी आला होता. त्याच वेळी, सोमवारी, भारताने युक्रेनच्या प्रदेशांवर रशियाच्या कब्जाचा निषेध करण्यासाठीच्या मसुदयावर गुप्त मतदानाऐवजी खुल्या मतदानाच्या बाजूने मतदान केले.

रशियाने युक्रेनच्या मुद्द्यावर गुप्त मतदानाचा प्रस्ताव दिल्यानंतर अल्बेनियाने खुल्या मतदानाला पसंती दिली. भारतानेही अल्बेनियाने मांडलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. अल्बेनियन प्रस्तावाच्या बाजूने 107 मते मिळाली, तर 13 देशांनी विरोध केला आणि त्यावेळी 39 देशांनी अनुपस्थित दर्शवली होती. यापूर्वी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे चार जिंकलेले प्रदेश आपल्या देशात विलीन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. क्रेमलिनमध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात पुतिन म्हणाले की, लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन प्रदेश आणि झापोरिझिया प्रदेश हे आता कायमस्वरूपी आपल्या देशाचा भाग आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने