Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनबदल तुह्माला 'या' गोष्टी कदाचित माहिती नसतील, जाणून घ्या सर्वकाही


ब्युरो टीम : देशातील पहिली हायस्पीड ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. ती सध्या तीन मार्गांवर धावत आहे. दिल्ली ते वाराणसी,  दिल्ली ते कटरा आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी गुजरातमधील गांधी नगर ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे. ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिची स्पीडची मर्यादा 180 किलोमीटर प्रतितास आहे. येत्या काही महिन्यांत ती ताशी 200 किलोमीटर स्पीडनं धावण्यास सुरुवात करेल.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यात रिक्लाइनिंग सीट बसवण्यात आली आहे. तसेच स्वयंचलित फायर सेन्सरची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधेसह अपग्रेड केलेल्या ट्रेनमध्ये तीन तासांचा बॅटरी बॅकअपही आहे. वंदे भारत ट्रेन ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुसज्ज आहे. ही ट्रेन स्व-चालित इंजिनसह आहे. याचाच अर्थ, या ट्रेनला वेगळं इंजिन नाही. समोर आणि मागील दोन्ही बाजूस लोको पायलट केबिन आहे. ट्रेनमध्ये जीपीएस प्रणाली बसवल्यामुळे तिचं लोकेशन मोबाइलवरही पाहता येतं. 

ट्रेनची वेळ आणि ठिकाण मोबाइल अॅपवर दाखवलं जाते. सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्हीही बसवण्यात आलेत. ट्रेनमधील कोचची टॉयलेट विमानातील टॉयलेटप्रमाणे व्हॅक्यूम बेस्ड बायो टॉयलेट्स आहेत. यामुळे शौचालय स्वच्छ राहील. कोचमध्ये आपत्कालीन पुश बटण असून, जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दाबलं जाऊ शकतं. ट्रेनमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास चेअर ही एक आरामदायी युरोपियन शैलीची सीट आहे, जी सोनेरी, व्हायलेट आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे. या ट्रेनच्या लगेज रॅकमध्ये एलईडी डिफ्यूज दिवे आहेत. हे दिवे अनेकदा विमानात बसवले जातात.

स्पीड @१८० , पण ग्लासातील पाणी साडलं नाही

वंदे भारत एक्सप्रेस सेमी हायस्पीड ट्रेन स्पीड ट्रायलसाठी 24 ऑगस्ट 2022 रोजी कोटा स्टेशनवर पोहोचली होती. कोटा येथे या एक्सप्रेसच्या 6 स्पीड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पहिली टेस्ट कोटा ते घाट का बराना, दुसरी टेस्ट घाट का बराना ते कोटा, तिसरी टेस्ट डाउन लाईनवर कुर्लासी ते रामगंज मंडी, चौथी आणि पाचवी टेस्ट कुर्लासी ते रामगंज मंडी, आणि सहावी टेस्ट रामगंज मंडी ते लबान डाउन लाईनवर घेण्यात आली. या टेस्ट दरम्यान ट्रेनचा स्पीड ताशी 180 किलोमीटर होता. ट्रेनमध्ये पाण्याचा ग्लास भरून ठेवून या टेस्ट घेण्यात आल्या होता. मात्र 180 चा स्पीड असूनही ग्लासमधील पाणी सांडलं नव्ह


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने