धक्कादायक! दक्षिण कोरीयाची राजधानी सियोलमध्ये चेंगराचेंगरी, १०० हून अधिक जखमी



ब्युरो टीम : दक्षिण कोरीयाची राजधानी सियोलमध्ये काल, शनिवारी (30 ऑक्टोबर 2022) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरीत १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर यातील काही जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ आला समोर

सियोल येथील हॅमिल्टन हॉटेलजवळील एका अरुंद रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी जमावाने एकमेंकांना ढकलण्यास सुरुवात केली, त्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

या चेंगराचेंगरीनंतर राजधानी सियोलमधील शेकडो आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जवळपास १४० रुग्णवाहिका जखमींवर उपचार करण्यासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब मृतांचा आकडा जाहीर केला नाही. मात्र, नॅशनल फायर एजन्सीने स्वतंत्रपणे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं की, आपत्कालीन रुग्णांची संख्या नेमकी नेमकी किती आहे? याची मोजणी सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने