WhatsApp वापरताय मग या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

 


आपल्या सर्वांना WhatsApp बद्दल माहिती आहे आणि आपण त्याचा बराच  वापरही करतो. परंतु भारत सरकारने मागील वर्षी नवीन आयटी नियम लागू केले होते. हे नवीन नियम आल्यानंतर सोशल मीडिया मार्फत चुकीचे काम करणाऱ्यांवर वेगाने कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत, WhatsApp ने ऑगस्ट महिन्यात एकूण 23,28,000 खाती बंद केली आहेत. यापैकी बहुतेक अशी खाती आहेत जी या प्लॅटफॉर्मचा वापर गैरकृत्य किंवा फसवणूक करण्यासाठी करत होते. WhatsApp ने अकाऊंट बॅन करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर जुलै महिन्यातही कंपनीने एकूण 23.87 लाख अकाऊंट बॅन केले होते. जर तुम्ही WhatsApp वापरत असाल तर WhatsApp वापरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुमचे अकाउंट देखील बॅन होऊ शकते (Don't ignore these things while using WhatsApp.)   

BULK मेसेज पाठवणे: जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचे मार्केटिंग करत असाल आणि मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवून किंवा ऑटो डायलिंग करून ग्राहकांना त्रास देत असाल तर अशा परिस्थितीत तुमच्या खात्यावर बंदी येऊ शकते.

खोटी माहिती शेअर करणे: जर तुम्ही खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी WhatsApp वापर करत असाल तर अशा परिस्थितीत तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.

द्वेषयुक्त शब्द वापरणे: लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.

अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवणे: तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये अश्लील मेसेज किंवा व्हिडिओ शेअर केल्यास WhatsApp तुमच्या खात्यावर बंदी घालू शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने