भारतीय वंशाचे डॉ. मूर्ती हे WHO कार्यकारी मंडळाचे अमेरिकन प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी डॉ. मूर्ती यांना WHO कार्यकारी मंडळाचे अमेरिकन प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित केले आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार डॉ.मूर्ती अमेरिकेच्या 'सर्जन जनरल' या पदा सोबत या नवीन पदाची जबाबदारी सांभाळतील. मार्च 2021 मध्ये, बिडेन अध्यक्ष झाल्यानंतर, यूएस सिनेटने देशाचे 21 वे 'सर्जन जनरल' म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचे 19 वे 'सर्जन जनरल' म्हणूनही काम केले होते.

अमेरिकेत 'सर्जन जनरल' या पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीचे काम देशातील आरोग्य सेवा सुधारणे हे आहे. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, 21वे 'सर्जन जनरल' म्हणून डॉ. मूर्ती यांनी आरोग्यविषयक चुकीच्या माहितीचे वाढते प्रमाण, तरुणांमधील मानसिक समस्यांसह सार्वजनिक आरोग्याच्या अनेक महत्त्वाच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मूर्ती 6,000 हून अधिक सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचे नेतृत्व करतात. हे सार्वजनिक आरोग्य अधिकारी देशातील वंचित लोकसंख्येसाठी काम करतात.

व्हाईट हाऊसने सांगितले की, डॉ. मूर्ती, भारतीय वंशाचे पहिले 'सर्जन जनरल', मायामीमध्ये वाढले असून  त्यांनी हार्वर्ड, येल स्कूल ऑफ मेडिसिन आणि येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले. मूर्ती, एक प्रसिद्ध चिकित्सक, संशोधन शास्त्रज्ञ, उद्योजक आणि लेखक आहेत, ते वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांची पत्नी डॉ. एलिस चेन आणि त्यांच्या दोन मुलांसह राहतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने