Winter Season : सावधान! थंडीपासून वाचण्यासाठी तुह्मी हिटरचा वापर तर करीत नाही ना?


ब्युरो टीम : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून  वाचवण्यासाठी लोक उबदार कपडे घालतात. तर काहीजण घर गरम करण्यासाठी रुम हिटरचा आधार घेतात. यामुळे काही मिनिटांत तीव्र थंडीपासून आराम मिळतो. पण तुम्ही नियमित घरामध्ये हिटरचा वापर करत असाल तर सावधान! कारण यामुळे थंडीपासून आराम मिळत असला तरी सातत्याने हिटरचा वापर करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. 

रुम हिटर थंडीत खूप आराम देतात. पण हा काहीकाळाचा आराम तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण बहुतेक हीटर्स च्या आतील बाजू मुख्यतः लाल-गरम धातूच्या रॉड्स किंवा सिरॅमिक कोर  असतात. त्यातून निघणारी उष्णता हवेतील आर्द्रता शोषून घेण्याचे काम करते. हिटरमधून बाहेर पडणारी हवा बऱ्यापैकी कोरडी असते. हे हवेतील ऑक्सिजन बर्न करते. त्यामुळे जर श्वसनाचा विकार असणारा रुग्ण असेल, तर त्याच्यासाठी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. याशिवाय हिटर त्वचेशी संबंधित विविध समस्यांचे कारण बनू शकते.  चला तर, हिटर आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, ते जाणून घेऊयात

1. डोळे निरोगी ठेवण्यासाठी त्यामध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे. पण हिटरमधून निघणारी कोरडी हवा डोळ्यातील ओलावा शोषून घेते. त्यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे आदी समस्या निर्माण होतात. डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

2. रूम हीटर आणि ब्लोअरमधून बाहेर पडणारी कोरडी हवा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर लाल ठिपके, सुरकुत्या पडणे आदी समस्या निर्माण होऊ शकते. काही वेळा त्वचेचा कोरडेपणा इतका वाढतो की खपल्या निघू लागतात.

3. तुम्हाला दमा किंवा श्वसनाचा त्रास होत असेल, तर तुम्ही हिटर जास्त वापरू नये. हिटर हवा कोरडी करतो, तसेच त्यातून हानिकारक वायू बाहेर टाकला जातो. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय हिटरच्या कोरड्या हवेमुळे घसा वारंवार कोरडा पडणे, जळजळ होणे, फुफ्फुसात कोरडेपणा, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. हिटरची हवा फुफ्फुसात गेल्यास कफ तयार होण्याची समस्या उद्भवू शकते.

दरम्यान, हिटरमुळे थंडीपासून आराम मिळतो. मात्र तासनतास त्याच्या समोर बसल्याने त्वचेचे आणि आरोग्याचे विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते. हिटरचा वापर करताना सावधगिरी बाळगून या समस्या टाळता येऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने