केंद्रीय गृह मंत्रालयाने केले विशेष मोहीम 2.0 चे यशस्वी आयोजन

 


केंद्रीय गृहमंत्रालयाने 2 ते 31 ऑक्टोबर  2022 या कालावधीत विशेष मोहीम 2.0 यशस्वीरीत्या राबवली. या विशेष स्वच्छता मोहीम 2.0 अंतर्गत 11,559 ठिकाणी निवडण्यात आली होती. ज्यामध्ये  सार्वजनिक प्रणालीच्या अखत्यारीतील  क्षेत्रीय  आणि ‘आउटस्टेशन’  कार्यालयांचा समावेश आहे. या अंतर्गत खासदार कार्यालय, संसदीय कामकाज, आंतर-मंत्रिस्तरीय सल्लामसलत, राज्य सरकार, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रारी आणि सार्वजनिक तक्रारी अपील यांसारख्या विविध श्रेणींमधील प्रलंबित प्रकरणांचा कार्यक्षमतेने निपटारा करण्यात आला.

विशेष मोहीम 2.0 दरम्यान मंत्रालय आणि त्याच्या संलग्न/अधीनस्थ कार्यालयांमध्ये पुनरावलोकनासाठी एकूण 5.15 लाख फायली निर्देशित करण्यात आल्या. यापैकी 4.77 लाख फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले असून 2.81 लाख फायली निकाली काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत भंगार सामानाच्या विल्हेवाटीतून आलेले  उत्पन्न  1,40,99,510 रुपये इतके असून  90,525 चौरस फूट जागाही मोकळी करण्यात आली आहे.

विशेष मोहीम 2.0 च्या पूर्वतयारीच्या  टप्प्यात एकूण 5,126 सार्वजनिक तक्रारी आणि याचिका निवारणासाठी अधोरेखित करण्यात आल्या होत्या , त्यापैकी 4,708 सार्वजनिक तक्रारी आणि याचिकांचे  प्रभावीपणे निवारण करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने