आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. यासह केंद्र शासनाकडून राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 41 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी दिली.
प्रगती मैदानामध्ये आयोजित आंतराराष्ट्रीय व्यापार मेळावा आजपासून सुरू झाला आहे. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री.सामंत म्हणाले, राज्यात येत्या काळात 30 ते 40 हजार कोंटींची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी राज्य शासन विविध धोरणही आखत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रगती मैदान येथे 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” अशी आहे. महाराष्ट्राने या संकल्पनेवर विकासाचे दर्शन घडविणारे दालन साकारले आहे.
“वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” ही संकल्पना मांडताना डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत आहे. एकूण 45 स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवरील स्टॉल्स आहेत. बचत गटांचे, कारागिरांचे, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांतर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअप चे स्टॉल्स या ठीकाणी आहेत. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ असण्याचा मान मिळालेला आहे. ‘महाराष्ट्र दिवस’ हा सांस्कृतिक कार्यक्रम 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता एमपी सहभागृहात होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा