हिजाब विरोधात इराण (Iran) मध्ये आंदोलन पेटले असतांना इराणच्या एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये काही हल्लेखोरानी नागरिकांवर अंदाधुंद फायरिंग केली. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू तर १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हि घटना दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरात असलेल्या एका सेंट्रल मार्केटमध्ये घडली असून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याची आतापर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हिजाब विरोधात इराणमध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद सर्व जगात पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आंदोलकांना दडपण्यासाठी इराण सरकारतर्फे मोठी कारवाई केली जात आहे. तब्बल 15 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तसेच 13 आंदोलकाचा मृत्यू झाला आहे, आंदोलनात हिंसक चकमकीही देखील झाल्या आहेत.
यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी इराणच्या शिराज शहरातही गोळीबार झाला होता. यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी 2 हल्लेखोरांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार केला. शिया समुदायाचे पवित्र स्थान शाह चेराग येथे ही घटना घडली होती. इसिस ने हा दहशतवादी घडवून आणला होता.
टिप्पणी पोस्ट करा