गोव्यात झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सोहळ्याने सांगता

 


गेले नऊ दिवस देशविदेशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार आणि विविधांगी चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची आज गोव्यात पणजी इथे, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमवर झालेल्या शानदार सोहळ्याने सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि चित्रपट क्षेत्रातले नामवंत कलाकार उपस्थित होते. सर्जनशिलतेचा तरल अनुभव देणाऱ्या या महोत्सवातल्या सिनेमांपैकी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणी बाजी मारली याची उत्सुकताही आता संपुष्टात आली आहे. पुरस्कारासाठी परीक्षकांनी केलेली निवड म्हणजे केवळ कलेचा सन्मान नाही, तर ही निवड आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणा देखील आहे.

“प्रादेशिक चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले आहेत.  चित्रपटांमध्ये सशक्त आशय असेल तर, ते सहजपणे सर्वदूर पोहचतात आणि त्यांचं भरपूर कौतुकही होतं,” असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्यामुळे या विविधांगी कलेच्या क्षेत्रातल्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या कलेचा अविष्कार आपल्याला अनुभवता आला. भारत आज तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे, या  उच्च तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय चित्रपटांना जगभरात पोहचवण्यासाठी पुढेही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने