सेक्स करताना 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मैत्रिणीने मृतदेह बॅगेत भरून फेकला

 


गेल्या आठवड्यात बेंगळुरूच्या जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. आता पोलिसांनी या 67 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. 17 नोव्हेंबर रोजी ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्याच्या मृत्यूचे रहस्य समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, 67 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू एपिलेप्टिक अटॅकमुळे म्हणजेच शरीरसंबंधा दरम्यान ब्रेन स्ट्रोकमुळे झाला. यानंतर त्याची मैत्रीण आणि तिच्या पतीने व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून रस्त्यावर फेकून दिला. व्यावसायिकाच्या फोन कॉल्सच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी हा खुलासा केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फोन डिटेल्स आणि लोकेशन तपासल्यावर तो व्यावसायिक त्याच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रिणीची ओळख उघड केली जाऊ शकत नाही. जेपी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, '67 वर्षीय व्यावसायिकाचे 35 वर्षीय गृहिणीशी संबंध होते, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता तो तिच्या घरी पोहोचला. येथेच दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरु असताना याच दरम्यान व्यावसायिकाचा मृत्यू झाला. यामुळे त्याची प्रेयसी घाबरली आणि समाजात नाव खराब होईल या भीतीपोटी महिलेने पती आणि भावाला फोन केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

या तीन लोकांनी मिळून व्यावसायिकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन भागात फेकून दिला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ते आपल्या सूनेला भेटण्यास जात आहे असे बोलून घरातून निघून गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. हा व्यावसायिक अनेक आजारांनी ग्रस्त होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, सध्या या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे महिलेचा दावा खरा आहे की नाही हे सिद्ध होईल.असे वृत्त विविध मीडियाने दिले आहे   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने