गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा 72 तासांचा प्रचारासाठी दौरा

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या शेवटी गुजरातमध्ये प्रचार मोहीमत सक्रियतेने सहभाग घेणार असून ते सौराष्ट्र ते सुरत पर्यंतच्या किमान आठ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट देतील, पंतप्रधान सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्षही आहेत.

गुजरातमध्ये 19 नोव्हेंबरला संध्याकाळी पंतप्रधान वलसाडमध्ये सभेला संबोधित करतील. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सोमनाथ मंदिराला भेट देऊन ते सौराष्ट्र भागात चार सभांना संबोधित करणार आहेत. यासाठी वेरावळ, धोरर्जी, अमरेली आणि बोटाड ही  स्थळे निश्चित करण्यात आली आहेत, गेल्या विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्रातील या विधानसभा मतदारसंघात भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता पण परंपरागतपणे काँग्रेसला मत देणारा हा बालेकिल्ला भाजप अजूनही भेदु शकला नाही.

तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी सुरेंद्रनगर, भरूच आणि नवसारी येथे तीन सभा घेणार आहेत. भरूच हा पूर्वी काँग्रेसचे माजी दिग्गज अहमद पटेल यांचा मतदारसंघ होता, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे नवसारी येथील लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत आहेत. काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी हे देखील 21 नोव्हेंबरला नवसारीला भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदी, गुजरात राज्यातील पक्षाला आणखी चालना देण्यासाठी येथील मुक्कामादरम्यान राज्यातील नेत्यांशी बंद दाराआड बैठक घेण्याची अपेक्षा आहे. गुजरातमध्ये, भाजप पक्ष गेल्या 27 वर्षांपासून सत्तेत आहे आणि नरेंद्र मोदी हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. या विधानसभा निवडणुकीत  नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सी आर पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्षाने 140 हून अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे राज्य दीर्घकाळापासून भाजपचा बालेकिल्ला आहे आणि येथे परत सातव्यांदा सरकार स्थापन करण्याचा पक्षाला विश्वास आहे. 182 विधानसभा मतदारसंघ असलेल्या गुजरात राज्यात 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने