Amazon Inc 29 डिसेंबरपासून भारतातील आपला हा व्यवसाय बंद करणार

 


मंदीचा परिणाम अमेरिकन कंपन्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सततच्या कर्मचारी कपातीच्या बातम्यांदरम्यान आता Amazon Inc ने मोठा निर्णय घेतला आहे. असे वृत्त आहे की कंपनी पुढील महिन्यापासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करू शकते. इकॉनॉमिक टाइम्सने अॅमेझॉनच्या एका रेस्टॉरंट भागीदाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे त्यात म्हंटले आहे की अॅमेझॉन 29 डिसेंबरपासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करेल.

दुसरीकडे, अॅमेझॉनने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म देखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आहे. कंपनी पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते बंद करणार आहे. कोरोना महामारीनंतर कंपनीने हा प्लॅटफॉर्म भारतात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. याद्वारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांची तयारी करू शकतात, यात Byju's, Unacademy यासह अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या भारतात आहेत. आजकाल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची स्थिती दयनीय आहे कारण कोविडनंतर जवळपास सर्व शाळा, संस्था, महाविद्यालये ऑफलाइन सुरू झालेली आहेत.

गेल्या आठवड्यात अॅमेझॉनने 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकनार असल्याची  बातमी आली होती. न्यूयॉर्क टाइम्समधील एका अहवालानुसार, अॅमेझॉन कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेतील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कपात असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, भारतात हि कर्मचारी कपात होणार नाही. Amazon व्यतिरिक्त, यूएस टेक दिग्गज मेटा आणि ट्विटरने देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने