हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय, या द्वारे कसे कमवाल करोडो रुपये

 


मातीविरहित शेतीद्वारे भाजीपाला हा ग्रीनहाऊसमध्ये (Greenhouse) उगवला जातो. मातीविना होत असलेली शेती आजही देशातील अनेक भागातील शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे. देशात काही ठिकाणी छोट्या हायड्रोपोनिक फार्ममध्ये (Hydroponic Farm) विविध प्रकारच्या 50 पालेभाज्यांची लागवड केली आहे. देशातील आणि जगातील शेतकऱ्यांमध्ये हायड्रोपोनिक शेतीचे आकर्षण वाढत असून याबाबत जाणून घेण्यास शेतकरी उत्सुक आहेत.  

हायड्रोपोनिक हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ माती नसलेली आणि फक्त पाणी असलेली शेती. ही एक आधुनिक शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पाण्याचा वापर करून हवामान नियंत्रित करून शेती केली जाते. पाण्यासोबत काही वाळू किंवा खडे यांची देखील आवश्यक असते. यामध्ये, तापमान 15-30 अंशांच्या दरम्यान ठेवले जाते आणि आर्द्रता 80-85 टक्के ठेवली जाते. तसेच पाण्याद्वारे वनस्पतींना पोषक तत्वे दिली जातात.

हायड्रोपोनिक शेतीमध्ये पाईपद्वारे शेती केली जाते. यामध्ये वरच्या बाजूने छिद्रे केली जातात आणि त्याच छिद्रांमध्ये झाडे लावली जातात. पाईपमध्ये पाणी असते आणि झाडांची मुळे त्या पाण्यात बुडवली जातात. या पाण्यात झाडाला लागणारे सर्व पोषक घटक असतात. हे तंत्र लहान झाडे असलेल्या पिकांसाठी खूप चांगले आहे. यामध्ये गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, मटार, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, टरबूज, कॅनटालूप, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी या भाज्या आणि फळे पिकवता येतात.

भारतात काही शेतकरी आज हायड्रोपोनिक शेती किंवा हायड्रोकल्चर पद्धतीने शेती करून करोडो रुपये कमवत आहेत. यासाठी हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण आणि त्याच्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. या शेतीद्वारे शेतकरी परवडणाऱ्या किमतीत फळे आणि भाजीपाला पिकवता येतो. बाजारात भाजीपाल्याची मागणी पाहून शेतकरी या शेतीकडे वळत आहेत.  सुरुवातीला हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी खर्च जास्त होता, पण आता हा खर्च कमी झाला असून आणि उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे आज या प्रकारची शेती करून बरेचजण चांगले उत्पन्न कमावत आहेत. ग्रीन हाऊस हायड्रोपोनिक शेती उभारण्यासाठी प्रति एकर क्षेत्र सुमारे 50 लाख रुपये खर्च येतो.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने