लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे 14 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत. चार दिवसांच्या या दौऱ्यात ते त्यांचे समकक्ष अधिकारी आणि फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्य दृढ व्हावेत या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
लष्करप्रमुख या भेटीदरम्यान, पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या 4742 भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करणाऱ्या न्यूव्ह चॅपेल इंडियन मेमोरियलला पुष्पचक्र अर्पण करतील. ते संरक्षण दलाचे प्रमुख, लष्करप्रमुख आणि कमांडर कमांडमेंट डेस फोर्सेस टेरेस्ट्रेस (CFT) / लँड कॉम्बॅट फोर्सेसचे कमांडर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते भारत-फ्रान्स संरक्षण संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.
लष्करप्रमुख पॅरिसमधील विविध लष्करी प्रशिक्षण आस्थापनांचा समावेश असलेल्या इकोले सैनिकी तळाला भेट देतील आणि इकोले डी गुएरा-टी येथे अभ्यासक्रमाला उपस्थित असलेल्या वरिष्ठ कर्मचारी अधिकाऱ्यांना संबोधित करतील. ते ड्रॅग्युगनन येथील लष्करी शाळांनाही भेट देणार आहेत, या अव्वल दर्जाच्या प्रशिक्षण आस्थापना असून या संस्था निवड झालेले अधिकारी आणि नॉन-कमिशनड अधिकार्यांना प्रशिक्षण देतात.
सदैव विस्तारत असलेल्या संरक्षण सहकार्याच्या गुंतवणुकीमुळे दोन्ही सैन्यात प्रत्येक स्तरावर एक मजबूत संबंध प्रस्थापित झाला आहे. लष्करप्रमुखांच्या फ्रान्स दौऱ्यामुळे दोन्ही सैन्यांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ होतील.
टिप्पणी पोस्ट करा