छमछम गर्ल सपना चौधरीसह ५ जणांवर आरोप निश्चित, कार्यक्रम न करता पैसे हडपल्याचा आरोप

 


नृत्य कार्यक्रमाच्या तिकिटासाठी लाखो रुपये गोळाकरून कार्यक्रम सादर नकरता पैसे हडप केल्याचा आरोप असलेल्या डान्सर सपना चौधरीसह पाच जणांवर शुक्रवारी न्कयायालयात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या संबंधी आता 12 डिसेंबर रोजी साक्ष होईल. आरोप निश्चित करताना, ACJM शांतनु त्यागी यांनी साक्ष देण्यासाठी 12 डिसेंबर हा दिवस निश्चित केला आहे. सपना चौधरीशिवाय जुनैद अहमद, इबाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर पांडे शुक्रवारी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केल्या नंतर, न्यायालयात आरोपपत्राचे वाचन करण्यात आले तेव्हा या सर्वांनी आरोप नाकारले आणि खटला चालविण्याची मागणी केली.

या बाबत अधिक माहिती अशी आहे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत सपना चौधरी आणि इतर काही कलाकारांचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीटांची प्रति व्यक्ती ३०० रुपये दराने विक्री करण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकीट काढले होते, मात्र सपना चौधरी रात्री 10 वाजेपर्यंत आल्या नाहीत. सपनाची वाट पाहणाऱ्या लोकांनी यावर गोंधळ घातला. लोक तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी करत होते पण आयोजकांनी तसे केले नाही असा आरोप आहे. यानंतर 14 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौमधील आशियाना पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सपना चौधरी यांच्याविरुद्ध विश्वास भंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी 1 मे 2019 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर 20 जानेवारी 2019 रोजी कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांच्या विरोधात कलम 406 आणि 420 अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 10 मे रोजी सपना चौधरीने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ८ जून रोजी त्यांचा नियमित जामीन अर्जही सशर्त मंजूर करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने