पुण्याच्या लोहगाव विमान तळावरील वाहन तळाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन

 


पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या एरो मॉल या बहुमजली वाहन तळाचे उद्घाटन आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, भारतीय विमानतळ प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव विमानतळाच्या नवीन इमारतीचे आणि कार्गो सुविधेचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण केले जाईल असे सिंधिया यांनी यावेळी बोलताना सांगितले . ते पुढे म्हणाले की  पुण्यातून बँकॉक विमानसेवा सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात थेट सिंगापूर साठी विमानसेवा सुरू करण्यात येईल . पुण्यातून सध्या आठवड्याला 1600 उड्डाणे होतात त्यात वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . मुंबई प्रमाणेच पुण्याचाही विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले.

केवळ देशातीलच नव्हे तर जगातील नवरत्न म्हणून पुण्याचा विकास केला जाईल असे सांगून सिंधिया म्हणाले की ,  पुणे आणि कोल्हापूर  महत्वाची शहरे आहेत . त्यांचा सुयोग्य विकास व्हावा यादृष्टीने अनेकविध उपाय योजना केल्या जातील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने