अमेरिकेत (United States of America) होणाऱ्या हिंसाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. व्हर्जिनियातील शार्लोट्सविले (Charlottesville) शहरात असलेल्या व्हर्जिनिया (Virginia) विद्यापीठात अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी) गोळीबाराची घटना घडली आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच गोळीबार झाला, त्यात ३ जण ठार तर २ जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया आपत्कालीन व्यवस्थापनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली.
या प्रकरणानंतर स्थानिक पोलीस यंत्रणांनी गोळीबार करणाऱ्याला 24 तासानंतर ताब्यात घेतले आहे. शूटरचे नाव ख्रिस डार्नेल जोन्स आहे. त्याने बरगंडी जॅकेट, जीन्स आणि लाल शूज घातले होते. तसेच, तो VA टॅग TWX3580 असलेली काळी SUV चालवत होता. बंदूक हिंसा ही अमेरिकेत मोठी समस्या आहे. एका अहवालानुसार, या वर्षात आतापर्यंत अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गोळीबाराच्या 662 घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 671 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2616 लोक जखमी झाले आहेत. वर्षअखेरीस हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा