'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' नाटकामध्ये गोंधळ, सावरकरप्रेमी चिडले

 


'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय'  या नाटकामध्ये संबंधित दिग्दर्शक व कलाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल चुकीचा इतिहास मांडला. त्याचे तीव्र पडसाद नाट्यसभागृहात उमटले. सावरकर प्रेमींनी नाटक तात्काळ बंद करा, असे म्हणत थेट घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, व त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या सावरकर प्रेमींनी अखेरीला तो तोफखाना ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी निर्णय घेतला, व रात्री उशिराने यासंदर्भातला विषय सुरू होता.

६१ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर आज सुरू झाली. 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय'  हे नाटक पहिल्या दिवशी सादर झाले. मात्र, या नाटकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक अंतिम टप्प्यात असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, 'हे नाटक बंद करा'अशी घोषणाबाजी केली. तसेच नाटकानंतर स्वतःच्या भावना व्यक्त करताना या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असून अशा नाटकाचे प्रयोग राज्यात पुन्हा कुठेही होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

 दरम्यान, पहिल्याच दिवशी राज्य नाट्य स्पर्धेतील नगर केंद्रावर वाद झाल्याने पुन्हा एकदा नगर केंद्र चर्चेत आले आहे. नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने आज राज्य नाट्य स्पर्धेत 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' हे नाटक सादर केले. मात्र या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला. 'मी नथुराम गोडसेच बोलतोय' या नाटकांमध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने  गांधी हत्या केल्याचा नथुराम गोडसे यांना पश्चाताप झाला,  यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोषी होते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी सावरकर प्रेमींना खूपच वेदनादायी ठरल्या.

विशेष म्हणजे नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभा राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत, हे नाटक सादर करणारे कलाकारांचा दिग्दर्शकांचा व स्पर्धेच्या आयोजकांचे निषेध केला.  काही ज्येष्ठ रंगकर्मी यांनी देखील या नाटकात चुकीचा इतिहास दाखवलं असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्यावरही दोन रंगकर्मीच्या गटांमध्येही बाचाबाची झाली. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला. मात्र यावेळी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचे   सावरकर प्रेमींच्या वतीने उत्कर्ष गीते व अमोल हुबे पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने