सध्या चर्चेत असलेल्या इंस्टाग्राम स्टार गौतमी पाटीलची दर्दभरी जीवन कहाणी तुम्हाला माहित आहे का?

 


इंस्टाग्राम स्टार गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. सांगली मधील एक कार्यक्रम सध्या मीडियात चांगलाच चर्चिला जात आहे या कार्यक्रमाच्या वादानंतर तिने एक पत्रकार परिषदेत घेतली यात तीने आपली आयुष्याची दर्दभरी कहाणी सांगितली. तसेच माझ्याकडून लावणी सादर करताना काही अश्लील कृत्य झालं असले, तर मी माफी मागते, असंही ती यावेळी म्हणाली.

गौतमी पाटील ने सांगितले, मी खानदेशकडची. धुळे जिल्ह्यातलं सिंदखेडा हे माझ्या आईचं गाव. चोपडा हे वडिलांचं गाव. माझा जन्म झाल्यानंतर वडिलांनी आईला सोडलं. वडिलांनी आईला नवव्या महिन्यातचं सोडलं, तेव्हापासून मी आईसोबत राहते आईच्या वडिलांनी मला सांभाळलं. लहानपणापासून मी आजोबांकडचं राहायची. लहानपणापासून मी माझ्या वडिलांना पाहिलं नव्हतं. आठव्या वर्गात असताना मी वडिलांना पाहिलं. त्यांना पुण्यात आणण्याचा मामांनी प्रयत्न केला. पण, ते काही व्यवस्थित राहिले नाही. दारु पित होते. आईला मारहाण करत होते. त्यामुळं आम्ही त्यांना सोडलं. 

पुण्यात आईनं बिसलरीच्या कंपनीत काम केलं. आईचा अपघात झाला व आईचे कामं गेलं. मी शिक्षण करत होते. परंतु मला शिक्षण अर्धवट सोडावे लागलं. मी सुरुवातीला डान्स क्लासला विश्वकला अकादमीत होते. यानंतर  आर्केस्ट्राचे काम तुमची पोरगी करेल का, अशी विचारणा माझ्या घरी करण्यात आली. महेंद्र बंसोडे सर यांच्याकडं सुरुवातीला मी काम केलं. आकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला शो. यात बॅक डान्सर म्हणून मी काम केलं.

त्यात मला पाचशे रुपये मानधन मिळालं. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर विविध कार्यक्रम केले. सानिया ताई भेटल्या आणि नंतर मी अल्पवधीत प्रसिद्ध झाले. मला चित्रपटात देखील काम करायला आवडेल अशी भावना गौतमीने या प्रसंगी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने