महिलांनो ब्युटी पार्लरमध्ये केस धुताना सावधानता बाळगा

 


हैदराबादमधील एका 50 वर्षीय महिलेसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाणे दु:स्वप्न ठरले. केस कापण्यापूर्वी धुवत असताना महिलेला पक्षाघाताचा झटका आला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केस धुत असताना मान वाकल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणारी महत्त्वाची नस दाबली गेल्यामुळे हि घटना घडली. उपचारानंतर महिला ठीक झाली आहे.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, ब्युटी पार्लरमध्ये शॅम्पूने केस धुत असताना महिलेला सुरुवातीला चक्कर आली, त्यानंतर अस्वस्थता आणि उलट्या झाल्या. तिला प्रथम गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडे नेण्यात आले. तेथे यात सुधारणा झाली नाही. दुसर्‍या दिवशी चालण्यात थोडीशी अडखळयामुळे नंतर ती डॉक्टर सुधीर कुमार यांच्यापर्यंत तपासणीसाठी पोहोचली. एमआरआयने मध्ये तिच्या मेंदूच्या भागात अडथळा असल्याचे स्पष्ट झाले. केस धुताना वॉश-बेसिनकडे मान वळवल्याने असे होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हि माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे.  

डोके मसाज करताना आणि केस धुताना मानेला धक्का बसणे हे ब्युटी पार्लर स्ट्रोकचे कारण असू शकते असे न्यूरोलॉजिस्टचे मत आहे. अनेक वेळा मसाज करताना मान आणि डोके जोरात दाबले जाते. काहीवेळा मान देखील वाकवली जाते. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमचा प्रथम उल्लेख डॉ. मायकेल वेनट्रॉब यांनी 1993 मध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये केला होता. त्याच वर्षी पाच अमेरिकन महिलांना हेअर सलूनमध्ये शॅम्पू केल्यानंतर गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणे विकसित झाली. यामध्ये चक्कर येणे, असंतुलन आणि चेहरा सुन्न होणे यांचा समावेश होता. तेव्हा महिलांनो ब्युटी पार्लरमध्ये सावधानता बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने