वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं, अमोल कोल्हे यांचे सूचक वक्तव्य

 


"मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्यामुळे ही गोष्ट मला पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं. निवडणूक अजून खूप लांब आहे, आताच पक्षांतर आणि नाराजी या गोष्टींच्या चर्चा करण्यात काहीही तथ्य नाही. अकारण बुद्धीभेद करण्याचा हा प्रयत्न विकासाच्या वाटेपासून दूर नेणारा आहे, मला त्यात रस नाहीये," असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

सांसद प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदार संघाचा (shirur lok sabha constituency) दौरा केल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं होते. पटेल यांच्या या विधानानंतर अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानानंतर आणखी संभ्रम वाढलाय.

अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याआधी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या गरुडझेप चित्रपटानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीबाबत नाराजी आणि भाजपसोबत जवळीक निर्माण होत असल्याची चर्चा सुरु झालीय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने