तिच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवुन हा उडवायचा गर्लफ्रेंड बरोबर रंगरेलियां

 


लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यात  आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यामुळे दिल्ली पोलिसांचेही होश उडाले आहे. 18 मे 2022 रोजी हत्या झालेल्या श्रद्धा वालकरचे रहस्य समोर यायला 6 महिने का लागले? हे गुपित लपवण्यासाठी गुन्हेगार आफताबने असे जाळे विणले आहे की, श्रद्धाच्या हत्येच्या तपासात गुंतलेल्या दिल्ली पोलिसांचा संभ्रम वाढला आहे.

एका मिडिया रिपोर्ट नुसार 18 मेच्या रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान आफताबने श्रद्धाची हत्याच केली नाही तर मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने बाथरूममध्ये नेऊन तिचे 35 तुकडे केले, असा आरोप आहे. त्यानंतर अनेक दिवस दररोज मध्यरात्री तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमधून काढून मेहरौलीच्या जंगलात फेकून देत असे. आफताबने मेहरौलीच्या जंगला व्यतिरिक्त मैदानगढी तलाव आणि गुरुग्रामच्या जंगलात देखील श्रद्धाच्या शरीराचे अवयव फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले लोकेशन कळू नये यासाठी तो मोबाईल फोन घरातच सोडून शरीराचे अवयव फेकून देत असे.

आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धा हत्येचे रहस्य लपवण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली होती. रात्री घरातून बाहेर पडल्यावर तो मोबाईल खोलीतच ठेवायचा, जेणेकरून तपासादरम्यान त्याचे लोकेशन घरीच मिळावे. मोबाईल फोन रूममध्ये ठेवल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे अवयव सुटकेससारख्या पॅकेटमध्ये घेऊन बाहेर पडत असे, ज्यामुळे तो दुसऱ्या कामानिमित्त निघून जात असल्याचा भास होईल.

कोणालाही संशय येऊ नये म्हणून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आफताबने ऑक्टोबरपर्यंत जपून ठेवले होते, अशीही माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात 19 नोव्हेंबर रोजीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तो एक अतिशय लहान सुटकेस घेऊन बाहेर पडला हे स्पष्टपणे दिसत आहे. यावरून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्यावेळी ठिकठिकाणी फेकल्याचे लक्षात येत आहे. यामुळेच दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी मेहरौली जंगल आणि गुरुग्रामच्या वनपरिक्षेत्रात तसेच मुंबईतील भाईंदर खाडीत जावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे मृतदेहाच्या तुकड्यांच्या स्वरूपात हाडे सापडत आहेत, पण ती श्राद्धाची आहेत का? हे अद्याप सिद्ध झाले नाही.

तपासादरम्यान आफताबच्या चौकशीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले आहेत, परंतु अद्यापपर्यंत करवत सापडलेली नाही, ज्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. याशिवाय दिल्ली पोलिसांनी आफताबच्या खोलीतून श्रद्धाच्या कपड्यांसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, आफताब श्रद्धाच्या शरीराचे अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचा आणि हळू हळू फेकायचा. 

दरम्यान, अशीही माहिती समोर आली आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर 20-25 दिवसांतच त्याने bumble अॅपच्या माध्यमातून 20 हून अधिक गर्लफ्रेंड बनवल्या होत्या. यापैकी बहुतेक त्याच्या घरी आल्या होत्या. श्रद्धाच्या शरीराचे अवयव फ्रीजमध्ये होते आणि त्याच्या मैत्रीण त्याचबरोबर रंगरेलियां उडवत होत्या हे काही कमी धक्कादायक नाही. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, श्रध्दा खून प्रकरणानंतर मृतदेहाच्या तुकडय़ांना वास येऊ नये यासाठी तो परफ्युम वापरत असे आणि त्याच्या मैत्रिणी येण्याच्या आधीपासून अगरबत्ती पेटवून ठेवत असे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने