पंतप्रधान रोजगार योजनेतून किती कर्ज मिळते, जाणून घ्या कसा होईल फायदा

 


सरकार बेरोजगारांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणते. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान रोजगार योजना (PMRY). ज्याद्वारे सरकार बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून जातीच्या आधारावर काहीजणांना सूट देण्यात आली आहे. हि योजना जुनी असली तरी त्याचे फायदे अद्याप घेतले जाऊ शकतात.

या योजनेद्वारे देशातील लघु उद्योजक बांधकाम, व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात काम सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये दिले जातात. व्यवसाय व्यतिरिक्त खेळत्या भांडवलासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या योजनेचा संयुक्तपणे लाभही घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंतचे संयुक्त कर्ज मिळू शकते. तसेच यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टनुसार फायदे देखील मिळतात. ज्यामध्ये प्रकल्पाच्या खर्चाच्या 15 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाखापर्यंत मदत दिली जाते.

सरकारने दिलेले हे कर्ज बँकेच्या दरानुसारच मिळते. ज्याची परतफेड तुम्हाला तीन ते सात वर्षांपर्यंत करावी लागते, या योजनेत शेतीशी संबंधित उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात सर्व प्रकारच्या व्यवसायाचाही समावेश होतो. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचलमधील बेरोजगारांसाठी, अनुदान जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे लागते. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 40 हजारांपेक्षा जास्त आणि एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे, उमेदवारांनी किमान आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रतेची मर्यादा नाही. यासाठी तुमच्याकडे कायमचा पत्ता असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत आर्थिक मदत किंवा त्याच्या समकक्ष संस्थांद्वारे तुम्हाला कधीही डिफॉल्टर घोषित केले नसलेले पाहिजे.या बाबत तुम्ही अधिक माहिती व अर्ज dcmsme.gov.in/publications/pmryprof/ABOUTPMRY.html येथे करू शकता 

या योजनेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतील

पत्त्याचा पुरावा,

आधार कार्ड,

शैक्षणिक प्रमाणपत्र,

उत्पन्न प्रमाणपत्र,

जात प्रमाणपत्र,

जन्म प्रमाणपत्र



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने