राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासांच्या आत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा येथील आव्हाड समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. समर्थक कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपास रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कार्यकर्ते यांच्या भावनेनुसार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे आहे. यामुळे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही तासांमधील हा दूसरा गुन्हा आहे. पहिला गुन्हा हा 'हर हर महादेव' चित्रपट बंद पाडल्याच्या मुद्द्यावरून दाखल झाला होता, त्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. मात्र, न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना याप्रकरणी जामीन मिळाला होता. हे प्रकरण होऊन काही तास होत नाही तोच दूसरा गुन्हा दाखल झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा