या महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट थिएटरला रिलीज होणार

 


बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटांचा दुष्काळ आहे. लोक चांगल्या चित्रपटांची वाट पाहत आहेत, आता येणारा नोव्हेंबर महिना चित्रपट रसिकांसाठी धमाकेदार असणार आहे. या महिन्यात एक-दोन नव्हे तर 6 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत, या महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट थिएटरला रिलीज होणार आहेत, तर चला जाणून घेऊया या यादीत कोणते चित्रपट समाविष्ट आहेत.

1. फोन भूत (Phone Bhoot) या यादीत पहिले नाव कतरिना कैफच्या फोन भूत या चित्रपटाचे आहे. या चित्रपटातून कतरिना कैफ बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत.

2. मिली (Mili) जान्हवी कपूर तिच्या 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर तिच्या वडिलांच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार आहे. 'मिली' ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मल्याळम चित्रपट 'हेलन'चा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटासाठी जान्हवी कपूरने आपल्या व्यक्तिरेखेसाठी 7.5 किलो वजन वाढवले ​​आहे. या चित्रपटात सनी कौशल देखील आहे, जो बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.

3. डबल XL (Double XL) बऱ्याच दिवसांपासून गायब असलेली सोनाक्षी सिन्हा लवकरच 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हुमा कुरेशीही दिसणार आहे. चित्रपटाची कथा दोन जाड आकाराच्या महिलांवर आधारित आहे हि एक मजेदार कथा आहे सोनाक्षी आणि हुमा व्यतिरिक्त या चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्याही भूमिका आहेत आणि क्रिकेटर शिखर धवन देखील चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.

4. उंचाई (Uunchai)सात वर्षांनंतर सूरज बडजात्या चित्रपटांच्या दुनियेत पुनरागमन करत आहेत. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा 'उंचाई' आहे. या चित्रपटात एव्हरेस्ट बेस कॅम्पवर प्रवास करणाऱ्या तीन मित्रांची कथा आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा, नफिसा अली आणि डॅनी डेन्झोंगपा दिसणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

5. दृश्यम्-2 (Drishyam-2)अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'दृश्यम' च्या पुढील भागाची प्रतीक्षा आता संपणार आहे. दृश्यम 2 हा अभिषेक पाठक दिग्दर्शित क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

6. भेडिया (Bhediya)याच महिन्यात वरुण धवनचा 'भेडिया' चित्रपटही रिलीज होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला वेअरवॉल्फ चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एकीकडे कॉमेडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे वरुण धवनचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर वरुण धवनला लांडग्याने चावा घेतल्याचे कळते, त्यानंतर त्याच्या आत इच्छाधारी लांडग्याचा आत्मा येतो. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने