शिवसेना ठाकरे गट यांची मशाल पहिल्याच प्रयत्नात पेटली, अंधेरी पूर्व मधुन ऋतुजा लटके यांचा विजय

 


अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी 66 हजार 247 मतं मिळवत या निवडणुकीत विजय प्राप्त केला. राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाला आपले वर्चस्व दाखवून देण्याच्यादृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता हि निवडणूक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली होती. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी  नोटा पेक्षा 53469 मते जास्त मिळवत जिकंली, ऋतुजा लटके यांच्या या विजयानंतर शिवसेना (उ.बा.ठा.) यांची मशाल पहिल्याच प्रयत्नात पेटली असेच म्हणावे लागेल. 

आज सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मते १९ फेऱ्यांमध्ये मोजण्यात आली. ऋतुजा लटके यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. ही आघाडी लटके यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली मात्र, नोटाच्या पर्यायाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली सरतेशेवटी ऋतुजा लटके यांना 66247 तर नोटाला 12778 मतं मिळाली.

अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. ऋतुजा लटके यांचे रश्मी ठाकरे यांनी स्वत: औक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. अंधेरीतील विजयामुळे शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने