हे सरकार कायद्याने चालणारं, कोणत्याही सूडभावनेतून कारवाई होणार नाही, पोलिसांना त्यांचं काम करु द्यावं.

 


राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर 72 तासांच्या आत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले 'पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केलीये. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलाय. हे सरकार कायद्याने चालणारं आहे. त्यामुळे कोणत्याही सूडभावनेतून कारवाई होणार नाही. महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस पुढील चौकशी करत आहेत. पोलिसांना त्यांचं काम करु द्यावं. ते नियमानुसार कारवाई करतील.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचं औचित्य साधून मुंबईतील परळच्या शिरोडकर शाळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या अनुषंगाने पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारले. यावर बोलताना शिंदेंनी यावर भाष्य केले.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने