या शहरात मा. नितीन गडकरी यांच्या आगोदरच शिवसेना (उ.बा.ठा.) नेत्यांनी केले उड्डाणपुलाचे उद्घाटन

 


नगर शहरातील बहुचर्चित असा तयार झालेल्या उड्डाण पुलाचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या 19 तारखेला उद्घाटन होणार आहे परंतु या आधीच या बहुचर्चित आशा पुलाची आज नगर शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी करुन व औपचारिकरित्या नारळ फोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव  विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, दत्ता कावरे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, बबलू शिंदे, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, शरद कोके, संदिप दातरंगे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

याप्रसंगी बोलतांना संभाजी कदम म्हणाले, नगरमध्ये उड्डाणपुल व्हावा, यासाठी माजी आमदार अनिल राठोड व माजी खासदार दिलीप गांधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यासाठी स्व.अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत तर खा.दिलीप गांधी यांनी दिल्लीतून पाठपुरावा केला. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अखेर या पुलाचे काम सुरु झाले. परंतु ज्यांच्या प्रयत्नांनी खर्‍या अर्थाने हा उड्डाणपुल झाला, ते दोन्ही जनतेतील नेते स्व.अनिलभैय्या व खा.दिलीप गांधी हयात नाहीत.  परंतु खर्‍या अर्थाने ज्यांचे योगदान यासाठी आहे, त्यांचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिकांनीच या पुलाचे उद्घाटन करुन त्यांच्या कार्याची जाणिव सर्वांना करुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, राज्यात अनेक जिल्ह्यात उड्डाणपुल होत असतांना नगरमध्येही पुला व्हावा, यासाठी स्व.अनिलभैय्या राठोड यांनी मोठे प्रयत्न केले. ज्यावेळी राज्यात शिवसेना - भाजपाची सत्ता होती, त्यावेळी नगरमध्ये आलेल्या मंत्र्यांना नगरमध्ये उड्डाणपुल होणे किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी सांगून मुंबईतही त्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर स्व.खा.दिलीप गांधी यांचेही मोठे योगदान राहिले, परंतु आता त्याचा सध्या विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही औपचारिक उद्घाटन केले आहे, लवकरच हा पुला नागरिकांसाठी खुला होईल, असे सांगितले.

यावेळी स्व.आ.अनिलभैय्या राठोड व स्व.खा.दिलीप गांधी यांचे फोटो असलेले फलक घेत मोठ-मोठ्या घोषणा देत कार्यकत्यांनी पुलावरील वातावरण दणाणुन सोडले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्यावतीने आज पुलाची पाहणी होणार असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पुलावर ठिकठिकाणी मोठ-मोठे गल्डर टाकून रस्ता बंद करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने