ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, आज संध्याकाळी पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

 


मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात अभिनय करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते आज दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 20 दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र आज अखेर हा अभिनेता काळाच्या पडद्याआड विसावला  त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.

आज संध्याकाळी त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे पार्थिव ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला 'गोदावरी' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला असून त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. त्यांनी मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. त्यांनी ‘अग्निहोत्र’ माहिलेकत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका चांगली गाजली होती. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम करत आहेत. विक्रम गोखले यांनी 2010 मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते.

विक्रम गोखले यांना 2013 मध्ये अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) मिळाला असून, त्यांना   2015मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. तसेच 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, 2018 मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने