अमेरिकेचे नौदल सचिव कार्लोस डेल टोरो 17 ते 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत, भारताच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार आणि भारत सरकारचे नवी दिल्ली येथील उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. कार्लोस डेल टोरो, कोची येथे भारतीय नौदलाच्या दक्षिण नौदल कमांडला भेट देणार आहेत, जिथे ते दक्षिण नौदल कमांडच्या (SNC)कमांडर-इन-चीफ यांच्याशी संवाद साधतील आणि कोचीन शिपयार्ड येथे भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस (INS) विक्रांतला भेट देतील.
भारत आणि अमेरिका यांच्यात पारंपरिकपणे जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध हे परस्पर विश्वासावर आधारीत आणि आत्मविश्वापूर्ण राहिले आहेत, 16 जून रोजी भारताला प्रमुख 'संरक्षण भागीदार दर्जा' प्रदान केल्यानंतर हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी काही मूलभूत करार केले आहेत. ज्यामधे 2015 मध्ये स्वाक्षरी केलेला संरक्षण संरचनेसंबंधीच्या कराराचा समावेश आहे, जो दोन्ही देशांच्या संरक्षण आस्थापनांमधील सहकार्याची रूपरेषा स्पष्ट करतो, लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ऍग्रीमेंट (LEMOA) हा करार 2016 मध्ये स्वाक्षरी करण्यात आला, जो दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये परस्पर लॉजिस्टिक समर्थन सुलभ करणारा मूलभूत करार आहे. कम्युनिकेशन्स कंपॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी ऍग्रीमेंट (COMCASA) हा करार 06 सप्टेंबर 18 रोजी करण्यात आला, जो दोन्ही राष्ट्रांच्या सशस्त्र दलांमध्ये माहितीची देवाणघेवाण सुलभ करतो आणि अलीकडचा, बेसिक एक्सचेंज कॉपरेशन ऍग्रीमेंट अर्थात मूलभूत विनिमय सहकार्य करार (BECA), ज्यामुळे संरक्षण मंत्रालये आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय भूस्थानिक एजन्सी (एनजीए)यांच्यात भौगोलिक - स्थानिक माहिती सामायिक करणे शक्य होते.
भारतीय नौदल अमेरिकी नौदलाला अनेक मुद्द्यांवर जवळून सहकार्य करते, ज्यात मलबार सारख्या युद्धनौका प्रात्यक्षिक सरावाचा समावेश आहे, या प्रात्यक्षिक सरावाची शेवटची मोहीम जपान मधल्या योकोसुका येथे 09 ते 15 नोव्हेंबर 22 दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि आरआयएमपीएससी (RIMPAC) 22 ही सरावांची मालिका, प्रशिक्षण देवाणघेवाण, व्हाईट शिपिंग(बिगर लढाऊ जहाज) माहितीची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रातील विषय तज्ञ, या सर्वांचा समन्वय दरवर्षी आयोजित केलेल्या कार्यकारी सुकाणू गटाच्या बैठकीच्या (ESG) माध्यमातून साधला जातो. याव्यतिरिक्त, दोन्ही नौदलाच्या युद्धनौका नियमितपणे एकमेकांच्या बंदरांवर पोर्ट कॉल करतात. दोन्ही नौदलांनी ‘मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक’ या सामायिक उद्दिष्टासह सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्याच्या दिशेनेही सहकार्य केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा