जोडीदारांनी भांडण करताना या चुका टाळायला हव्या, नाहीतर होऊ शकतो घटस्फोट

 


नवरा बायको किवां जोडीदारांमध्ये भांडणे होणे हे सामान्य आहे परंतु जर ते सतत घडत असेल, तर असे असु सकते की तुम्ही वाद घालत असताना काही चुका पुन्हा करत आहात. या चुका तुमचे नाते खराब करू शकतात, तसेच तुम्हला यामुळे मानसिक शोषण, थकवा आणि नातेसंबंध टिकवून ठेवने हे आव्हानात्मक वाटू शकते. यासाठी तुम्ही पुढील 6 चुकांवर काम करा आणि तुमचे नाते चांगले बनवा.

वाद सुरु असताना तुमचे हात उगारणे, माघार घेणे, बोटांचे जेश्चर वापरणे, डोळे फिरवणे इत्यादी कृती जी बचावात्मक देहबोली असते तेव्हा ती समोरच्या व्यक्तीचा राग वाढवते. उपहास करणे, डोके हलवणे आणि हात मुरगळणे यासारख्या कृतींमुळे देखील परिस्थिती बिघडू शकते. तेव्हा वाद सुरु असताना हे करणे टाळायला हवे 

हे एक अतिशय सामान्य आहे. वादाची सुरुवात जरी एका विषयापासून झाली असली तरी इतर अनेक विषय यात गुंडाळले जाऊन त्याचे रुपांतर प्रचंड भांडणात होते. वाद सुरु असताना जुनी भांडणे आणि भूतकाळातील चुका देखील जोडल्या जातात. तुम्ही एका वेळी फक्त एकच समस्या हाताळू शकता आणि इतर अनेक समस्या एकत्र केल्याने, ते तुम्हाला गोंधळात टाकेल आणि त्याचा कोणताही परिणाम न होता वाद अधिकच वाढेल. 

दुसर्‍याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखासाठी त्यांना दोष देणे हे अगदी सामान्य आणि सोपे आहे परंतु शेवटी जर ही सवय असेल तर तुम्ही तुमचे नाते गमावाल. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही वाद जिंकला आहे आणि नातेसंबंधातील दुसरा जोडीदार हरला आहे, परंतु सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार आणि नातेसंबंध दोन्ही गमावाल.

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकत नाही तेव्हा तुम्हाला कदाचित कळू शकत नाही की तुमचा जोडीदार तुमच्यावर इतका का रागावला आहे. समोरची बाजू ऐकून घेणे महत्वाचे आहे, यात असे काहीतरी असू शकते ज्याची आपण अपेक्षा केली नव्हती. हा एक गैरसमज असू शकतो जो काही वेळेपूर्वी दूर व्हायला हवा.

अनेक वेळा असे म्हटले गेले आहे की संवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मौखिक संवाद. फोन वापरा किंवा समोरासमोर भेटा आणि बोला. तुम्ही एकमेकांना text पाठवत असताना, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा टोन कोणालाही कळू शकत नाही. पुष्कळ जोडपी text करून भांडतात तेव्हा ते आपले संबंध खराब करतात. त्याचा अनेक प्रकारे चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो.

हि चूक मजेदार वाटू शकते परंतु त्याचे खूप महत्व आहे. जेव्हा तुम्ही थकलेले किंवा भुकेले असता तेव्हा भांडण केल्याने तुम्हाला नंतर पश्चात्ताप होत आहे  असे वाटू शकते. एका अभ्यासानुसार, शरीरात कमी ग्लुकोज लेवल असलेले लोक (जे अन्नातून येते) त्यांच्या जोडीदारां बद्दल अधिक आक्रमक वर्तन दाखवतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने