राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार

 


दक्षिणेकडील राज्यांमधील पदयात्रा संपल्यानंतर, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सोमवारी महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. हि यात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातुन आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रे बरोबर राहुल गांधी (Rahul Gandhi) आज सोमवारी संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मदनूर नाका येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

यात्रेसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने जोरदार तयारी केली असून यात्रेला महाराष्ट्रातही भरघोस यश मिळवण्याचा त्यांचा अंदाज आहे. आज राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर शिष्टमंडळ रात्री दहाच्या सुमारास मशाल आणि एकता मशाल घेऊन महाराष्ट्रातुन यात्रेला सुरुवात करतील. यात्रेच्या राज्यातील 14 दिवसांच्या प्रवासात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघातून 381 किमी चालणार आहेत.

या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या 8 नोव्हेंबर रोजी सहभाग नोंदवणार आहेत, पवार हे प्रकृती अस्वास्थामुळे फक्त एक मैलाहून कमी अंतर चालतील सध्या शरद पवार यांच्यावर  मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना (ShivSena-UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि त्यांचे सुपुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील या यात्रेत सहभाग नोंदवण्याची शक्यता असून त्यांनी अद्याप त्यांचे वेळापत्रक निश्चित केलेले नाही. 

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षातुन अरविंद सावंत आणि मनीषा कायंदे  हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. तर भारत जोडो यात्रेत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाईजगताप, अशोक चव्हाण आदींसह काँग्रेसचे अनेक बडे नेते देखील सामील होणार आहेत. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा एकूण 3,570 किमीच्या पदयात्रेत आणखी 2,355 किमी अंतर कापेल. हि यात्रा पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये संपेल.

भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून दिवसेंदिवस यात्रेला प्रतिसाद वाढत आहे, असा दावा काँग्रेसने यापूर्वी केला आहे तसेच महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उ.बा.ठा.) यांनी यात्रेत सहभागी होण्याचे मान्य केल्याने महाराष्ट्रात या यात्रेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

विशेष म्हणजे यात्रेदरम्यान राहुल गांधींसह पक्षाचे सर्व खासदार, नेते आणि कार्यकर्ते हे डब्यातच (containers) मध्ये राहत असून, काही डब्यात स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एसीही बसवले आहेत. ठिकाणे बदलण्या बरोबरच तीव्र उष्णता आणि तेथील हवामान लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसला यश मिळताना दिसत नाही परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यश मिळवण्याचा प्रयत्न म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने