यंदाचा 19 वा आशियाई चित्रपट महोत्सव 12 ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवासाठी राज्य शासनाकडून 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मुंबईच्या ‘दि एशियन फिल्म फाऊंडेशन’ संस्थेमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसहाय्य करण्याबाबत सूचना केली होती. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.
19 व्या आशियाई चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार असून याशिवाय या महोत्सवाच्या परीक्षक मंडळात राज्य शासनाचा प्रतिनिधी असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा