पुढील आठवड्याच्या अखेरीस ट्विटरची ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु होणार

 


अलीकडेच ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती. ही सेवा काही दिवसांपूर्वी पाच देशांमध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर ट्विटर वापरकर्ते सशुल्क सबस्क्रिप्शन सेवेचा लाभ घेत होते आणि त्यांच्या नावासमोर ब्लू टिक्स बनवत होते. यादरम्यान अनेक बनावट अकाऊंटवर ब्लू टिक्स घेण्याचे प्रमाण देखील वादळे. बनावट खात्यांच्या अकाऊंटवर वाढते ब्लू टिक्स पाहून ट्विटरने शुक्रवारी, ११ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शनवर बंदी घातली होती.

यानंतर ही सेवा पुन्हा कधी सुरू करता येईल, असा प्रश्न युजर्सनी उपस्थित करत आहेत,अश्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे हे ब्लू टिक लवकरच रीस्टार्ट होणार आहे. कंपनी पुढील आठवड्यापासून याची सुरुवात करू शकते, अशी माहिती खुद्द इलॉन मस्क यांनी दिली आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने इलॉन मस्कला टॅग करून ट्विटर ब्लू परत कधी सुरु होणार आहे असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मस्क ने रिप्लाय केला आहे व लिहले आहे, शक्यतो पुढील आठवड्याच्या अखेरीस ही सेवा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. यावरून हे स्पष्ट झाले आहे की दरमहा $8 भरून ब्लू टिकची सेवा पुन्हा घेता येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने