तीन दिवसानंतर आहे चंद्रग्रहण वाचा काय होईल याचा तुमच्या राशीवर परिणाम

 


यावर्षी कार्तिक पौर्णिमेला 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण होणार आहे. भारतातील कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, रांची, गुवाहाटी इत्यादी ठिकाणी चंद्रग्रहण पाहता येईल. जगात देव दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर आणि पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भागांमध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवरही देखील प्रभाव पडणार असून. चला जाणून घेऊ मेष ते मीन या  राशीच्या सर्व लोकांवर याचा काय परिणाम होईल.

मेष : मानसिक चिंता वाढेल, दैनंदिन नोकरीचा ताण जाणवेल, वैवाहिक व प्रेमसंबंधांमध्ये वाद किंवा तणाव निर्माण होतील, आई-वडिलांना त्रास जाणवेल. 

वृषभ : तुमच्या पराक्रमात वाढ होईल, भावांबद्दल तणाव जाणवेल, घर व वाहन यांच्या चिंता, अंतर्गत शत्रू वाढतील पण त्यावर विजय मिळवाल. मानसिक चिंता राहील. वैवाहिक आणि प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती होईल.

मिथुन : उत्पन्न व उत्पन्नाचे साधन वाढेल, मुलाच्या बाजूची थोडी काळजी राहील, मान-सन्मान व मेहनत वाढेल, घर आणि वाहन सुखात वाढ. जीवनसाथी आणि प्रेम संबंधात सुधारणा.

कर्क : मन अस्वस्थ, आरोग्याच्या समस्या जाणवतील, अवाजवी ताण राहील. धन, मान-सन्मान आणि नोकरीत वाढ संभवते. आई बाबांची चिंता जाणवेल. जीवनसाथी आणि प्रेम संबंधात प्रगती होईल.

सिंह : सरकारी किंवा उच्च अधिकार्‍यांशी तणाव राहील. घर आणि वाहन सुखात वाढ. उत्पन्न व नफा वाढेल. मनोबल आणि आरोग्य अचानक क्षीण होईल. पोट आणि पायांच्या समस्या राहतील. वादविवाद टाळा, वैवाहिक आणि प्रेम संबंध सामान्य आहेत.

कन्या : संपत्तीत वाढ होईल. वैवाहिक सुख आणि प्रेमसंबंध वाढतील. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये थोडासा ताण जाणवेल. आईच्या प्रकृतबाबत चिंता जाणवेल .

तूळ : संपत्ती आणि पराक्रमात वाढ. मानसिक चिंता वाढेल. वैवाहिक आणि प्रेम संबंधात तणाव. घर आणि वाहन सुखात वाढ. पोट आणि पाय दुखणे सतावेल. अंतर्गत शत्रू वाढतील.

वृश्चिक : मनोबल आणि आरोग्याबाबत मन नाराज राहील. पैशांची वाढ होईल परंतु खर्च वाढेल. प्रवास खर्चात अचानक वाढ. शिक्षण आणि पदवीमध्ये प्रगती होईल. मुलाबद्दलची चिंता राहील. वैवाहिक आनंद आणि प्रेम संबंधांमध्ये तणाव जाणवेल.

धनु : संपत्तीच्या नवीन स्रोतात वाढ होईल. सन्मान आणि आनंदात वाढ होईल. वैवाहिक आनंद आणि प्रेम संबंधांमध्ये तणाव. व्यवसायाचा विस्तार होईल. आई बाबांना त्रास जाणवेल. मुलाबद्दल अस्वस्थता जाणवेल.

मकर : मनोबल आणि आरोग्यात सुधारणा. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. जीवनसाथी आणि प्रेम संबंधांवर बिघडतील. उत्पन्नाच्या साधनांमध्ये अडथळा. मुलांची आणि शिक्षणाची चिंता. आई-वडिलांच्या तब्येतीची चिंता राहील.

कुंभ : स्पर्धा आणि शत्रूवर विजय मिळेल. खर्चात वाढ होईल. संपत्तीत वाढ संभवते आर्थिक लाभ मिळतील, घर आणि वाहनाची चिंता जाणवेल. जीवनसाथी आणि प्रेम संबंधांबाबत त्रास किंवा तणाव.

मीन : मुलांची चिंता जाणवेल, भाऊ, बहिणी आणि मित्रांना शोक. पराक्रम आणि सन्मानात अडथळे. पोट आणि लघवीच्या समस्या राहतील.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने