रोजची फक्त दोन अंकी बचत तुम्हांला बनवेल लक्षाधीश

 


एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी जबरदस्त योजना घेऊन येत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकता. एलआयसीची अशीच एक खास योजना म्हणजे जीवन उमंग पॉलिसी. ज्यामध्ये तुम्ही दररोज 45  रुपयांची गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त रिटर्न मिळवायचे असतील, तर एलआयसीची ही पॉलिसी तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. चला तर या पॉलिसीबद्दल जाणून घेऊया.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी या कंपनीची विमा पॉलिसी एखादा दुसरा अपवाद वगळता जवळपास सर्वांकडेच असते. कारण सुरुवातीला विमा क्षेत्रात ही एकमेव मोठी कंपनी कार्यरत होती. आता मात्र अनेक खासगी कंपन्या विमा क्षेत्रात उतरल्या असून या क्षेत्रातली स्पर्धाही वाढली. या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध पॉलिसी बाजारात आणण्याची चढाओढच सुरू असते. त्यात एलआयसी देखील मागे नाही. आता एलआयसीनं ग्राहकांसाठी अशी एक पॉलिसी आणली आहे, जी अगदी कमी गुंतवणुकीत तुम्हाला 36,000 रुपये वार्षिक रिटर्न देईल. ती पॉलिसी म्हणजे ‘जीवन उमंग पॉलिसी’ याबाबत एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने वृत्त दिलंय.

एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी इतर योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. यामध्ये, लाइफ कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये निश्चित उत्पन्न येईल. तसेच पॉलिसीची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच  पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि वारसदाराला एकरकमी रक्कम मिळेल. या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती 100 वर्षांपर्यंतचे कव्हरेज प्रदान करते.

गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या पॉलिसी अंतर्गत टर्म रायडर बेनिफिट देखील उपलब्ध आहे. बाजारातील जोखमीचा कोणताही परिणाम या पॉलिसीवर होत नाही. परंतु या पॉलिसीवर एलआयसीच्या नफा-तोट्याचा परिणाम नक्कीच होतो. आयकर कलम 80 सी अंतर्गत ही पॉलिसी घेतल्यावर टॅक्स सूट देखील उपलब्ध आहे. जीवन उमंग पॉलिसीची योजना घेताना किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागतो.

या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिन्याला 1350 रुपये प्रीमियम भरल्यास,  एका वर्षात ही रक्कम 16,200 रुपये होते. जर या पॉलिसीची मुदत 30 वर्षांची असेल, तर मुदत पूर्ण झाल्यावर ही रक्कम सुमारे 4 लाख 86 हजार रुपयांपर्यंत वाढते. त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीवर 31 व्या वर्षापासून कंपनी तुम्हाला दरवर्षी 36 हजार रुपये रिटर्न देण्यास सुरुवात करते. एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी ती पॉलिसी लाँच करीत असते. त्यामुळेच ही लोकप्रिय आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने